येरमाळा, कळंब, परंडा येथे चोरी 

 

येरमाळा : येरमाळा ग्रामस्थ- अंगद उध्दव बारकुल यांच्या घराचा पुढे केलेला दरवाजा अज्ञात व्यक्तीने दि. 04.09.2022 रोजी 23.30 वा. ते 05.09.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान उघडून घरातील अंदाजे 77,500 ₹ किंमतीचे 21.8 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,000 ₹ रोख रक्कम तसेच गावकरी- गोवर्धन अरविंद गुरव यांच्याही घरातील पत्र्याची पेटीचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आतील अंदाजे 1,56,000 ₹ किंमतीचे 45 ग्रॅम वजनोच सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अंगद बारकुल यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मार्केट यार्ड, कळंब येथील- प्रकाश लालचंद बलदोटा हे दि. 02.09.2022 ते दि. 05.09.2022 रोजी दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील डब्यातील 50 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 2 कि.ग्रॅ. वजनाचे चांदीचे दागिने- वस्तु व 1,19,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,59,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रकाश बलदोटा यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : पाचपिंपळा, ता. परंडा येथील- रणजित महाविर मंगरुळे यांचा अंदाजे 1,20,000 ₹ किंमतीचा ट्रॅक्टरचा ट्रेलर त्यांच्या घरासमोरील अंगनातून तर गावकरी- विलास विठ्ठल खैरे यांचा नांगरणीचा पंजा देखील अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रणजित मंगरुळे यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


शिराढोणमध्ये एकास मारहाण 
 

शिराढोण  : शिराढोण , ता. कळंब येथील- उदयप्रकाश बाळासाहेब माकोडे हे दि. 05.09.2022 रोजी 10.30 ते 11.00 वा. दरम्यान आपल्या घरात असतांना गावकरी- नितीन, दयानंद व अमरदिप लक्ष्मण यादव- पाटील या तीघा बंधुंसह मनोज व अभिजीत मनोज पाटील हे पिता- पुत्र व अन्य शंभु महाजन, सुदर्शन पाटील,  राम पवार या सर्वांनी जुन्या वादातून माकोडे यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने काठी, पातेले, चाकु, कुऱ्हाड यांनी मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या घरातील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने घेउन निघुन गेले. अशा मजकुराच्या उदयप्रकाश माकोडे यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 327, 307, 452, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.