शिरढोण : मद्यपी चालकांवर गुन्हे नोंद

 

शिराढोण  : पिंपरी (पाडे), ता. कळंब येथील- विजय अरविंद गोरे व शिराढोन येथील- अशोक दादाराव कांबळे या दोघांनी दि. 16.10.2022 रोजी 12.45 वा. सु. शिराढोन येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील मोटारसायकल मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द शिराढोन पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 रहदारिस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 परंडा  : कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथील- राजेंद्र पोपट गोरे यांनी दि. 16.10.2022 रोजी 11.20 वा. सु. गोल्डन चौक, परंडा येथील सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी वाहन क्र. एम.एच. 45 एएफ 0517 हे रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे 

 परंडा  : परंडा येथील- सचिन दशरथ डुकरे यांच्या गावातीलच पाचपिंपळा रस्त्यालगतच्या खत व नर्सरी गुदामाचा पाठीमागील पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 15.10.2022 रोजी 18.30 ते दि. 16.10.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान उचकटून गुदामातील विविध कंपनीचे व विविध प्रकारच्या 10 ते 25 कि.ग्रॅ. वजनाच्या एकुण 61 पिशवी खत असा एकुण 2,25,660 ₹ किंमतीचा खत चोरुन नेला. अशा मजकुराच्या सचिन डुकरे यांनी दि. 16.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील- शिवराम खंडू नागणे यांच्या रामतिर्थ शिवारातील तलावावरील 10 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप व 120 फुट केबल असे एकुण 17,000 ₹ किंमतीचा माल दि. 08.10.2022 रोजी 10.00 ते दि. 12.10.2022 रोजी 11.00 वा. दरम्यान गावातील एका परिचीत व्यक्त्तीने चोरुन नेले असावा. अशा मजकुराच्या शिवराम नागणे यांनी दि. 16.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.