उमरग्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

उमरगा  : एका तरुणाने गावातीलच एका 17 वर्षीय मुलीशी (नाव- गाव गोपनीय) जवळीक साधून तीला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे 3 वर्षापासून तीच्याशी लैंगीक संबंध प्रस्थापीत करुन त्याने तीला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेउन तीचे शारिरीक व मानसिक शोषन केले. 

दरम्यान त्या मुलीने त्याला लग्ना संबंधी विचारले असता त्याने तीला टाळण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकाने दि. 07.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 366 (अ), 376, 376 (2) (जे), 376 (2)(एन) सह पोक्सो कायदा कलम- 4, 8 आणि ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलाचे अपहरण 

 नळदुर्ग : निलेगाव, ता. तुळजापूर येथील- सुरज राम मुळे, वय 17 वर्षे हा दि. 01.10.2022 रोजी 10.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर असताना तो बऱ्याच कालावधीनंतर घरी न परतल्याने सुरज याच्या कुटूंबीयांनी त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्याच्याबद्दल उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सुरजचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या सुरजचे पिता- राम नागप्पा मुळे यांनी दि. 07.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 विद्यार्थांत हाणामारी 

 उमरगा  : मुळज, ता. उमरगा येथील- रितेश रावसाहेब चव्हाण, गणेश सुरेश चव्हाण, विष्णु नेताजी चव्हाण यांसह धाकटीवाडी येथील- महादेव नामदेव पाटील या सर्वांनी दि. 07.10.2022 रोजी 13.45 वा. सु. उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयाच्या आवारात कत्ती हातामध्ये घेउन आपापसात मारहान केली. यात महादेव नामदेव पाटील यांस कत्ती लागल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या महाविद्यलयाचे उप प्राचार्य- गुंडाजीबापु मोरे यांनी दि. 07.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 34 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.