येरमाळा पोलिसांवर दगडफेक करणारे दरोडेखोर अटकेत, दोन  गुन्ह्यांची उकल

 

येरमाळा  : येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि- . दिनकर गोरे व पोलीस अंमलदार चालक- चिखलीकर यांचे पथक दि. 14.09.2022 रोजी रात्री 03.55 वा. सु. चोराखळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर चोराखळी फाटा परिसरात  शासकीय वाहनाने गस्त करत होते. यावेळी चुकीच्या दिशेने लाल रंगाची कार क्र. एम.एच. 14 सीसी 2578 ही जात असल्याचे दिसल्याने पथकाने पाठलाग करुन ती कार थांबवली. त्या कारचालक पुरुषास पोलीसांनी विचारपुस केली असता तो उडवा- उडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्या कारची पोलीसांनी झडती घेतली असता आतमध्ये चाकु, स्क्रु, कत्ती असे दरोड्याच्या तयारीचे साहित्य आढळले.

 यावर पथकाने त्याला पोलीस ठाण्यास नेण्याकामी आपल्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता त्याने विशिष्ट हाकारी देताच रस्त्या बाजूच्या अंधारातील त्याच्या अन्य साथीदार दरोडेखोरांनी पोलीस पथकावर दगडफेक करुन त्यास सोडवून नेले होते. याप्रकरणी पोलीसांनी भा.दं.सं. कलम- 399, 402, 353, 336 नोदवला आहे. याच दिवशी साधारणपने याच सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील उपळाई फाटा येथील एका हॉटेलसमोर विश्रांतीस उभ्या असलेल्या ट्रकच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून नळीद्वारे आतील डिझेल प्लास्टीक कॅनमध्ये भरुन चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे हॉटेल चालक- विनोद हारभरे यांना आढळले होते. अशा मजकुराच्या हारभरे यांच्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 248/2022 हा नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येरमाळा पो.ठा. च्या पथकाने आज दि. 14.10.2022 रोजी पारधी पिढी, कन्हेरवाडी येथील- राजेंद्र कालीदास काळे व पारधी वस्ती, बावी येथील- दादा लाला काळे व बावी शिवारातून एका विधीसंघर्षग्रस्त बालक या तीघांना ताब्यात घेउन गुन्हा करण्यास वापरलेली दोन चारचाकी वाहने त्यांच्याकडून हस्तगत केली. पोलीसांनी आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने अधिक तपास केला असता नमूद दोन्ही गुन्ह्यांसह येरमाळा घाटातील धावत्या ट्रक मधुन साखर चोरी प्रकरणी येरमाळा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 26/2022 हा दाखल असून सदर चोरीही त्यांनीच केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे येरमाळा पोलीसांनी दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यासह अन्य दोन गुन्ह्याची उकल केली.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळाब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक . एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पो.ठा. चे सपोनि-. दिनकर गोरे, पोलीस अंमलदार- मुकूंद गिरी, किरण शिंदे, धनंजय सांडसे, मोहम्मद सय्यद, गणेश गुळमे यांच्या पथकाने केली आहे.