कायदेशीर अटकेला प्रतिकार करणाऱ्यास एक वर्षे कारावासाची शिक्षा

 

लोहारा  : कायदेशीर अटकेला प्रतिकार करुन भा.दं.सं. कलम- 224 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कानेगाव, ता. लोहारा येथील रामेश्वर शिवराम गायकवाड यांच्याविरुध्द लोहारा पो.ठा. येथे गु.क्र. 43 /2017 हा नोंदवण्यात आला होता. या खटला क्र. 96/2017 ची सुनावनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहारा या न्यायालयात होउन आज दि. 12.05.2022 रोजी निकाल जाहीर झाला. यात भा.दं.सं. कलम- 224 चे उल्लंघन केल्याबद्दल गायकवाड यांना एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


फसवणूक 

भूम  : लातूर येथील अरुण भींड यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाथ्रुड शाखेत असलेले मुदत ठेव खाते तत्कालीन शाखा व्यवस्थापक- वासुदेव गावडे यांसह राजश्री भागवत गावडे व राहुल भागवत गावडे यांनी नोव्हेंबर 2002 ते मे 2022 या काळात भींड यांच्या बनावट सह्यांच्या सहायाने बंद करुन खात्यातील 94,171 ₹ हडपले. याबाबत भींड यांनी त्यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी भींड यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरुण भींड यांनी दि. 406, 420, 464, 465, 467, 468, 471, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.