मुरुममध्ये तरुणीची विनयभंग 

 

मुरुम : एक 20 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 10.09.2022 रोजी 11.00 वा. सु. तीच्या पत्रा शेडमध्ये अंघोळ करत असताना गावातीलच एका तरुणाने तीला पाहण्याचा प्रयत्न करुन तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावर त्या तरुणीने त्या तरुणाच्या कुटूंबीयांकडे त्याची तक्रार केली असता त्यांनी तीला शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दि. 10.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (क), 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 रस्ता अपघात

येरमाळा  : यशवंत नगर, नांदेड येथील- अजय भास्करराव झडपे, वय 58 वर्षे हे दि. 10.09.2022 रोजी 09.00 ते 06.00 वा. सु. येरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळील रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला.  अशा मजकुराच्या मयताचा मेहुना- संदीप भागवतराव कोळपकर, रा. गारखेडा, औरंगाबाद यांनी दि. 10.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.