उस्मानाबाद जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग 

 

उस्मानाबाद - एक तरुण गावातीलच 17 वर्षीय तरुणीचा (नाव- गाव गोपनीय) मागील एक महिन्यापासून पाठलाग करुन तीच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी दि. 02 मे रोजी 07.00 वा. सु. गावातील बस स्थानकावर असतांना त्या तरुणाने तीचा पाठलाग करुन तीला हाक मारुन, “माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला का बोलत नाही.” असे म्हणून तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 आणि पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

बेंबळी  : उमरेगव्हाण, ता. उस्मानाबाद येथील सचिन गोविंद दंडगुले, वय 19 वर्षे यांसह त्यांचे पाच नातेवाईक हे मेंढा, ता. उस्मानाबाद  येथील बलभिम राठोड या ऊसतोड मुकादमाकडून आगाऊ पैसे घेउन ऊसतोडणीसाठी  कामावर होते. सचिन दंडगुले यांचे नातेवाईक दि. 30.04.2022 रोजी सकाळी 08.00 वा. सु. घेतलेले आगाऊ पैसे बलभिम राठोड यांना परत न करता पळुन गेले. यावर ती आगाऊ रक्कम परत करावी किंवा दंडगुले यांच्या पळून गेलेल्या नातेवाईकांनी कामावर परत यावे या कारणावरुन बलभिम राठोड यांनी सचिन दंडगुले यांचे 14.00 अपहरन करुन अज्ञात ठिकाणी डांबुन ठेवल्याचा सचिन यांचे पिता- गोविंद काशीनाथ दंडगुले यांना संशय आहे. अशा मजकुराच्या गोविंद दंडगुले यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 365 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल 

भुम  : रामेश्वर, ता. भुम ग्रामस्थ- रमेश दराडे यांनी गोलाई चौक, भुम येथील सार्वजनिक रस्त्यावर, वालवड ग्रामस्थ- रणजितराव कदम यांनी गावातील सार्वजनिक रस्त्यावर व हाडोंग्री ग्रामस्थ- दादासाहेब डमरे यांनी गावातील सार्वजनिक रस्त्यावर अशा तीघांनी दि. 05 मे रोजी आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा वाहतुकीस अडथळा होउन जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. तसेच भुम येथील आठवडी बाजार कट्यावर दिगंबर बाबर, रा. भुम यांनी मानवी जिवीत धोक्यात येईल अशा रितीने हातगाड्यावरील गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले.    यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भुम पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.