उस्मानाबादेत पोलिसाला धक्काबुक्की 

 

उस्मानाबाद : वडारगल्ली, उस्मानाबाद येथील- बालाजी सुर्यकांत जाधव हे दि. 19.11.2022 रोजी 17.45 वा. सु. उस्मानाबाद शहरातील सांजा रोडवर चालु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी आपली मोटारसायकल रस्त्यावर आडवी लाउन आरडा-ओरड करुन शिवीगाळ करत होते. 

सदर माहितीवरुन उस्मानाबाद शहर वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार- गोविंद रामकृष्ण शेंडगे हे सहकाऱ्यांसह नमूद ठिकाणी जाउन बालाजी जाधव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता बालाजी जाधव यांनी शेंडगे यांना शिवीगाळ करुन त्यांची गचांडी धरुन त्यांना धक्काबुक्की करुन “तुझा मर्डरच करतो.” अशी धमकी शेंडगे यांना दिली. या धक्काबुक्कीत शेंडगे यांच्या कळ्यावर, छातीवर बालाजी यांच्या नखाचे ओरबाडे उमटले. 

अशा प्रकारे शेंडगे यांच्या शासकीय कर्तव्यात बालाजी जाधव यांनी जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन गोविंद शेंडगे यांनी 19.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  रहदारिस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायकरित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 19.11.2022 रोजी कारवाया केल्या. यात कुमाळवाडी येथील- नितीन पाटील व माळकरंजा येथील- दत्ता सायळकर या दोघांनी 11.55 वा. सु. आपाल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एके 0347 व पिकअप क्र. एम.एच. 06 एजी 0259 ही वाहने ढोकी पेट्रोल पंप चौकातील सार्वजनिक रस्त्यावर तर  उस्मानाबाद येथील- व्यंकटेश पडीले व राजेंद्र जाधव या दोघांनी 17.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे रिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0945 व रिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0318 ही वाहने उस्मानाबाद बस स्थानकासमोरील रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द ढोकी पो.ठा. येथे 2 व आनंदनगर पो.ठा. येथे 2 असे एकुण 4 गुन्हे नोंदवले आहेत.