परंडा : खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने बँकेचे कर्ज उचलले
परंडा : आसु, ता. परंडा येथील फारुख व शाकीरा मंजुर पटेल या दोघांनी गावकरी- एजाज रशीद शेख (पटेल) व त्यांची आई- मदिनाबी रशीद पटेल (ह.मु. बोरीवली पूर्व) यांचे आधारकार्ड, सातबारा यांत बदल करुन या खोट्या कागदपत्रांच्या सहायाने दि. 08.08.2016 रोजी परंडा येथील आयसीआयसी बँकेत जमीन तारण ठेउन एजाज यांच्या नावाचे खोटे बँक खाते काढले. यानंतर त्या बँक खात्यावर 4,43,000 ₹ चे पिक कर्ज घेउन त्या कर्जासह व्याजाची 5,53,000 ₹ रक्कम न भरता त्यांनी एजाज शेख यांसह बँकेची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या एजाज शेख यांनी दि. 14.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420, 465, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहान
उमरगा : उमरगा येथील सागर हिराजी व सिध्दु हिराजी सुरवसे या दोघा भावांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 13.02.2022 रोजी 23.00 वा. सु. कॉलनीतीलच हरि चंद्रकांत बनसोडे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना जखमी केले. यावेळी हरि यांच्या बचावास आलेला त्यांचा भाऊ- सचिन यांनाही लोखंडी गजाने मारहान केली तर हरि यांची पत्नी व मावशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हरि बनसोडे यांनी दि. 14 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.