उस्मानाबाद पोलिसांच्या गाडीला ट्रकची धडक, तीन पोलीस जखमी 

 

उस्मानाबाद  :  उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे  चालक पोलीस नाईक- बजरंग चव्हाण हे रात्र गस्ती दरम्यान वडगाव सिध्देश्वर -उस्मानाबाद असे महामार्गाने वाहन चालवत येत होते. यावेळी पाठीमागुन आलेल्या एका ट्रकची  त्यांच्या वाहनास पाठीमागुन  धडक लागली. या अपघातात चव्हाण यांचे वाहन रस्ता दुभाजकास धडकुन पलटले. या अपघातात चव्हाण यांच्यासह एक पोलीस अंमलदार व अन्य एक ग़ह रक्षक दल जवान किरकोळ जखमी झाला. अशा मजकुराच्या बजरंग चव्हाण यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279,337, 338  व मो वा का 134, 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.


परंडा  : डोमगांव येथे  दिनांक 12 मार्च रोजी 13.00 वा रघुनाथ बारसकर यांनी घराच्या बांधकामाच्या ठिकाणी सिंमेट मिक्सर उभा करतांना त्याच्या चाकास अडथळा लावला नाही. परिणामी अचानकपणे तो मिक्सर पुढे जाउन समोरील ट्रक व मिक्सर यांत रघुनाथ यांसह तुकाराम बारसकर हे दोघे दाबले गेले. या अपघातात रघुनाथ हे मयत होउन तुकाराम किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या तुकाराम बारसकर यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 287, 304 अ अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

 

चोरीचे दोन गुन्हे 

ढोकी : कसबे तडवळे येथील शेतकरी  बालाजी वाघमारे यांच्या शेतातील 225 किलो ग्रॅम हरब-याची साडेचार पोती व 75 किलो ग्रॅम गव्हाचे दिड पोते गहु दिनां 14 ते 15 मार्च रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या बालाजी वाघमारे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.   

 

उस्मानाबाद : चोराखळी येथील  अभिजीत बावकर यांची स्पेलडंर प्ल्स मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए टी 4351 ही  दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी गावातील किराणा दुकान समोरुन चोरीस गेली. अशा मजकुराच्या अभिजीत बावकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.