उस्मानाबाद जिल्ह्यात दि. ४ नोव्हेंबर रोजी चोरीच्या सहा घटना 

 

येरमाळा  : अविनाश अनंतराव जाधवर, वय 45 वर्षे हे कुटूंबीयांसह दि. 04.11.2022 रोजी 03.20 ते 03.35 वा. दरम्यान आपल्या घरात झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा चार अनोळखी ईसमांनी उचकटून घरात प्रवेश करुन अविनाश यांसह त्यांच्या कुटूंबीयांस काठीने मारहान करुन घरातील कपाटात असलेले 83 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 2,50,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 5,83,700 ₹ चा माल जबरीने चोरुन पसार झाले. अशा मजकुराच्या अविनाश जाधवर यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
परंडा :
भांडगाव, ता. परंडा येथील- अतुल धनाजी अंधारे, वय 32 वर्षे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.11.2022 रोजी 02.00 ते 03.00 वा. दरम्यान तोडून घरातील कपाटात असलेले रोख रक्कम व सुवर्ण दागिने असा एकुण 66,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अतुल अंधारे यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : येडशी, ता. उस्मानाबाद येथील- तबस्सुम सादिक शेख, वय 21 वर्षे या दि. 25.10.2022 रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथील बस स्थानकात बस मध्ये  चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन तबस्सुम यांच्या नकळत त्यांच्या बॅगमधील अंदाजे 8,000 ₹ किंमतीचा विवो मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या तबस्सुम शेख यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : होळी, ता. लोहारा येथील- शिवाजी हरिश्चंद्र पवार यांच्या होळी येथील शेतातील पत्रा शेडचा कडी- कोयेंडा अज्ञात व्यक्तीने दि. 06.10.2022 ते दि. 04.11.2022 रोजी दरम्यान तोडून आतील यतीज कंपनीचा पानबुडी विद्युत पंप व तीचे साहित्य असे एकुण 15,000 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी पवार यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग  : शिरगापूर, ता. तुळजापूर येथील- शिवाजी तानाजी जाधव यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. 25 एआर 6368 ही दि. 31.10.2022 रोजी 01.00 ते 05.00 वा. दरम्यान गावातील त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी जाधव यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत केशेगाव येथील- ईश्वर मल्हारी क्षिरसागर, वय 52 वर्षे यांच्या गावातीलच जुन्या घराच्या बांधकामावरील कपाटात ठेवलेले 1,00,000 ₹ रोख रक्कम दि. 28.10.2022 रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या ईश्वर क्षिरसागर यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.