उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , दोन जखमी 

 

उस्मानाबाद : सांजावेस गल्ली, उस्मानाबाद येथील मिनाज अमीर हमजा शेख, वय 50 वर्षे हे दि. 31.05.2022 रोजी 02.45 वा. सु. साई रोपवाटीका जवळील उस्मानाबाद- तुळजापूर महामार्ग क्र. 52 ने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने मिनाज शेख यांना पाठीमागून धडकल्याने मिनाज हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नसीर मिनाज शेख यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : परंडा येथील ज्योतीर्लिंग अशोक गायकवाड, वय 24 वर्षे यांसोबत केदारनाथ अनिल गायकवाड हे दि. 30.05.2022 रोजी 20.00 वा. सु. सोनारी शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 5569 ने प्रवास करत होते. यावेळी कार्ला ग्रामस्थ- राऊत यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7744 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद मो.सा. ला समोरुन धडकला. या अपघातात मो.सा. चालक- ज्योतीर्लिंग गायकवाड हे मयत होउन केदारनाथ हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या केदारनाथ गायकवाड यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.