कळंबमध्ये ट्रकने धडक दिल्याने एक ठार , दोन जखमी 
 

 

कळंब : गणेशनगर, कळंब येथील- गणेश पांडुरंग काळे यांसह त्यांची चुलते- जिवन प्रल्हाद काळे व गावकरी- हनुमंत नरहरी काळे हे तीघे दि. 28.10.2022 रोजी 08.15 वा. सु. कळंब येथील सोनार लाईन रस्त्याकडेला मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 964 सह थांबलेले होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. एम.एच. 10 एडब्ल्यु 7680 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद तीघांना धडकला. या अपघातात जिवन काळे व हनुमंत काळे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घेउन जात असताना जिवन काळे हे मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या गणेश काळे यांनी दि. 29.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल

 बेंबळी  : उस्मानाबाद बस आगारातील चालक- भागवत नारायण कांबळे हे दि. 29.10.2022 रोजी रात्री 02.30 वा. सु. एस.टी. बस क्र. एम.एच. 10 एन 9767 ही बस धुत्ता गावात मुक्कामी घेउन असताना ते बस मध्ये झोपलेले होते. दरम्यान अचानक कशाचा तरी आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिले असता बसच्या समोरील काच अज्ञात व्यक्तीने फोडून आर्थिक नुकसान केले असल्याचे त्यांना दिसले. यावरुन भागवत कांबळे यांनी दि. 29.10.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक आधिनियम कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बसमध्ये चोरी 

 मुरुम  : सोलापूर येथील- आयोध्या औदुंबर पवार या दि. 23.10.2022 रोजी 12.00 वा. सु. सोलापूर ते येणेगूर असा प्रवास एसटी बसने करत असताना बसमधील गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने आयोध्या यांच्या बॅगची चेन उघडून आतील अंदाजे 1,58,499 ₹ किंमतीचे 37.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आयोध्या यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या आयोध्या पवार यांनी दि. 29.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.