शेकापूर येथे जुन्या भांडणावरुन एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण
उस्मानाबाद : शेकापुर, ता. उस्मानाबाद येथील कैलास विठ्ठल पिसे हे दि. 19 मे रोजी 20.30 वा. सु. उस्मानाबाद येथील बेंबळी फाटा येथील रस्त्याने मोटारसायकलने जात होते. यावेळी शेकापुर येथील- सुरज कुबेर लगदिवे, कुबेर लगदिवे, सचिन लगदिवे, राजाभाउ लगदिवे यांनी कैलास पिसे यांना अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कटर चाकूने, दगडाने मारहान करुन कैलास यांना जखमी केले. अशा मजकुराच्या कैलास पिसे यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : बहिणीस सासरी त्रास देत असल्याच्या कारणावरुन चिकुंद्रा, ता. तुळजापूर येथील भाग्यवान लक्ष्मण गायकवाड यांनी दि. 20 मे रोजी 16.30 वा. सु. वहिणीच्या सासरी बारुळ, ता. तुळजापूर येथील महादेव बळी मस्के यांच्या घरी येउन वाद घातला. यावेळी सार्थक (वय 13 वर्षे) हा पिता- महादेव मस्के यांची बाजू घेत असल्याच्या कारणावरून भाग्यवान यांनी भाच्चा- सार्थक याला ठार मारण्याच्या उद्देशाने सार्थकवर पिस्टल मधून गोळी मारल्याने सार्थकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यास गोळी लागून तो जखमी झाला. अशा मजकुराच्या महादेव यांचा भाऊ- दिगंबर बळी मस्के यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504 सह शस्त्र कायदा कलम- 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
फौजदारीपात्र न्यासभंगाबद्दल एका आरोपीस शिक्षा
कळंब : फौजदारीपात्र न्यासभंग करुन भा.दं.सं. कलम- 409 चे उल्लंघन केल्याप्रकरणी धानोरा (शेळका), ता. कळंब येथील वसंत दत्तात्रय बाराते यांच्याविरुध्द कळंब पो.ठा. येथे गु.क्र. 11 /2006 हा नोंदवण्यात आला होता. या खटला क्र. 219/2014 ची सुनावनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब या न्यायालयात होउन काल दि. 21.05.2022 रोजी निकाल जाहीर झाला. यात भा.दं.सं. कलम- 409 चे उल्लंघन केल्याबद्दल बाराते यांना कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची व 2,000 ₹ दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.