परंडा तालुक्यात शेतीच्या वादातून खून 

 

परंडा  : सोनगिरी, ता. परंडा येथील पोपट भानुदास खरपुडे, वय 48 वर्षे यांनी भाऊ- महादेव भानुदास खरपुडे व पुतण्या- सुधीर महादेव खरपुडे यांना शेतात न येण्यास सांगीतच्या कारणावरुन दि. 24.04.2022 रोजी 18.00 वा. सु. नमूद दोघा पिता- पुत्रांनी पोपट खरपुडे यांना त्यांच्या शेतात काठीने, दगडाने मारहान करुन पोपट यांचा खून केला. अशा मजकुराच्या नवनाथ श्रीमंत वेताळ, रा. सोनगिरी यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
फसवणूक 

उस्मानाबाद : आशाबी बाबुलाल तांबोळी, रा. उस्मानाबाद या मयत झाल्या असतानाही इशरतजहॉ लालमुहम्मद शेख यांनी मध्यवर्ती शासकीय इमारत, उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक यांच्यासमोर त्या जिवंत असल्याचे व त्यांचे कुलमुखत्यार पत्र आपल्या नावे असल्याचे प्रतिज्ञा पत्रात जाणीवपूर्वक खोटे कथन केले. यावरुन कार्यालयीन कर्मचारी- रविकांत डहाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नोंदणी अधिनियम कलम- 82 सह भा.दं.सं. कलम- 181 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शरीराविरुध्दचे गुन्हे 

मुरुम  : तडकळ, ता. आळंद, जि. गुलबर्गा येथील नागंन्ना श्रीमंत गोरे यांसह त्यांची मुले- विजयकुमार व शांतेश्वर या तीघांनी पुर्वीच्या भाडणाच्या कारणावरुन दि. 24.04.2022 रोजी 14.30 वा. सु. चौगुले वस्ती, तुगाव, ता. उमरगो येथे नातेवाईकांच्या विवाह कार्यात नातेवाईक- काशीनाथ इश्वरअप्पा बाबशेट्टी, रा. येळंब, ता. उमरगा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी काशीनाथ यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी- शांताबाई पुतण्या- सिध्देश्वर व उमेश यांनाही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काशीनाथ बाबशेट्टी यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.