मोहा : हॉटेलात जेवायला नेले नाही म्हणून खून 

 

कळंब  : मोहा, ता. कळंब येथील दयानंद राजेंद्र कसबे, वय 40 वर्षे हे गावकरी- रविंद्र मडके, जगन्नाथ मडके, अजित मडके, आचारी तय्यब या सर्वांना बाहेर जेवणास नेत नेव्हते. याच रागातून दि. 29- 30 मे रोजी दरम्यानच्या रात्री नमूद चौघांनी गावातीलच येडेश्वरी हॉटेल समोर दयानंद यांना मारहान करुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या विकास राजेंद्र कसबे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 21 / 2022 फौजदारी प्रकीच्या संहिता कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 302 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत दि. 31 मे रोजी गुन्हा नोंदवला आहे.

 
लैंगिक छळ

उस्मानाबाद  : एका पुरुषाने गावातीच एका 33 वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) जवळीक साधून ऑगस्ट- 2020 ते मे- 2022 या कालावधीत तीच्याशी वेळोवेळी लैंगीक संबंध ठेवले. यातून त्यांना एक अपत्य होउन कालांतराने त्या महिलेने त्यास नकार दिला असता त्याने स्वत:च्या हाताची नस कापून आत्हत्या करण्याची तसेच आपल्याकडील तीचे खाजगी फोटो समाजात प्रसारीत करण्याची त्या महिलेला धमकी दिली. यासोबतच त्यां दोघांना झालेल्या अपत्याचा ताबा तो तीला मागत असून ते अपत्य ताब्यात न दिल्यास त्या महिलेस ठार मारण्याची  धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारी 

नळदुर्ग  : पुजारी तांडा, अणदुर येथील छाया संतोष राठोड या दि. 23 मे रोजी 15 वा. सु. गावकरी- मोकाशे यांच्या शेतात कामास होत्या. यावेळी ग्रामस्थ- नामदेव राठोड, गणेश राठोड, मैनाबाई राठोड या सर्वांनी तेथे जाउन कामाला जाण्याच्या कारणावरुन छाया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच छाया यांच्या मालकीचे वीस हजार रक्कम व अडीच तोळे सुवर्ण दागिने घेउन गेले. अशा मजकुराच्या छाया राठोड यांनी दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.