कळंब : एटीएम यंत्रामध्ये पैसे भरण्यासाठी दिलेल्या पासवर्डचा गैरवापर करून फसवणूक 

 

कळंब : रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि., औरंगाबाद या कंपनीने कर्मचारी- कृष्णा रमाकांत गायकवाड, रा. टाकळी (राव), जि. लातूर यांना एटीएम यंत्रामध्ये पैसे भरण्यासाठी दिलेल्या पासवर्डचा गैरवापर करुन व कंपनीचे नियम व अधिकाराचा गैरवापर करुन जागजी येथील टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएम यंत्रामूधन एकुण 4,00,000 ₹ रक्कम दि. 01.09.2022 ते दि. 15.09.2022 रोजी दरम्यानच्या काळात वेळोवेळी काढून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. अशा मजकुराच्या रायटर बिझनेस सर्व्हिसेस, प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी- बाळासाहेब महादेव खेडकर यांनी दि. 14.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी 
 
तुळजापूर  : चिट्टावाडी, ता. बिदर, राज्य- कर्नाटक येथील- सिद्राम काशिनाथ मरकुंदे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. के.ए. 38 व्ही 1515 ही दि. 11.10.2022 रोजी 01.00 ते 05.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील भक्त निवास समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सिद्राम मरकुंदे यांनी दि. 14.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : रोसा, ता. परंडा येथील- अभिजित पोपटराव पाटील यांच्या रोसा गट क्र. 52 मधील शेत विहीरीतील टाटा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप व इरफान समद शहाबर्फीवाले यांच्या परंडा गट क्र. 71 (1) मधील शेतातील लाडा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा व सुरज कंपनीचा 7 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप तसेच 2000 फुट केबल असे एकुण 55,500 ₹ किंमतीचे साहित्य दि. 01.10.2022 रोजी 18.00 वा. ते दि. 02.10.2022 रोजी 09.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अभिजित पाटील यांनी दि. 14.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ताडगावमध्ये हाणामारी 

 शिराढोण  : ताडगाव, ता. कळंब येथील- खंडु चंद्रकांत शिंदे, वय 36 वर्षे हे दि. 12.10.2022 रोजी 20.45 वा. सु. गावातील आपली पानटपरी बंद करुन घराकडे जात होते. यावेळी रस्त्याबाजूस उभे असलेले गावकरी- बालाजी भगवान शिंदे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून खंडू यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात खंडू यांच्या अवघड जागेवर व पोटावर चाकूचा वार लागून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या खंडू शिंदे यांनी दि. 14.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.