उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवसांत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  : एक 23 वर्षीय महिला तीच्या पतीसह दि. 24 मे रोजी 20.00 वा. सु. शेतात असताना गावातीलच एका 25 वर्षीय तरुणाने तीच्या पतीला काठीने मारहान केल्याने तो बेशुध्द झाला. यावेळी त्या तरुणाने त्या महिलेस मारहाण करुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत एका पुरुषाने गावातीलच एका तरुणीला (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत आपल्या घरी नेऊन तीच्याशी लैंगीक संबंध प्रस्थापित केले. त्या तरुणीने लग्न करण्याचा आग्रह धरला असता त्याने तीला शिवीगाळ व मारहान करुन घरातून हाकलून दिले. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तिसऱ्या घटनेत एका तरुणाने एका महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 17 मार्च रोजी कामानिमीत्त घरी बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास स्वत: गच्चीवरुन उडी मारुन जीव देन्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  : एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 22 मे रोजी 19.30 वा. सु. राहत्या परिसरात असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.