कळंबमध्ये साडेतीन लाखाचा गुटखा जप्त 

 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सहायक पोलीस अधीक्षक . एम. रमेश यांनी  मदिना चौकातील शुभम किराणा स्टोअर्स व सावित्रिबाई फुले शाळेमागील एक गुदाम अशा तीन ठिकाणी छापा मारून साडेतीन लाखाचा गुटखा जप्त केला आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब चे सहायक पोलीस अधीक्षक . एम. रमेश यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी काल दि. 10.01.2023 रोजी कळंब शहरात गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कळंब शहरातील मदिना चौकातील शुभम किराणा स्टोअर्स व सावित्रिबाई फुले शाळेमागील एक गुदाम अशा तीन ठिकाणी काही इसम अवैध गुटखा बाळगुन आहे. यावर पथकाने प्रथमत: मदिना चौक, कळंब येथील शुभम किराणा स्टोअर्स येथे छापा टाकला असता श्रीनिवास सत्यनारायण करवा हे विविध कंपनीचा गुटखा एकुण 19,090 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. तर सावित्रिबाई फुले शाळेमागे दोन ठिकाणी यात शुभम श्रीनिवास करवा एका ठिकाणी तसेच रुपेश विष्णुदास मालपाणी व मनोज झुबारलाल मालपाणी हे जवळज एका गुदामामध्ये विविध कंपनीचा गुटखा एकुण 3,36,190 ₹ किंमतीचा असा एकुण 3,55,280 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. यावरुन पथकाने नमूद सर्व ठिकाणचा गुटखा जप्त केला आहे.

 श्रीनिवास करवा, शुभम करवा, मनोज मालपाणी व रुपेश मालपाणी या सर्वांनी संगनमत करुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहित असतानाही जवळ बाळगलेले मिळुन आल्याने पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा क्र. 13/2023 हा भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 34 अंतर्गत दि. 10.01.2023 रोजी नोंदवला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि-  पुजारवाड, श्रीमती साबळे, पोलीस अंमलदार- अंभोरे, मंदे, चव्हाण, शेख यांच्या पथकाने केली आहे.