उस्मानाबादेत चंदनाची झाडे चोरी करणारी टोळी जेरबंद

 

उस्मानाबाद :  सुरक्षारक्षक- विजय सोमनाथ सरपाळे हे दि. 27.08.2022 रोजी रात्री 03.00 वा. सु. आकाशवाणी केंद्र, उस्मानाबाद येथे कर्तव्यास असताना केंद्राच्या कुंपनाच्या भिंतीवरुन 5 अनोळखी पुरुषांनी आत येउन विजय सरपाळे यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल फोन हिसकावून आकाशवाणी केंद्राच्या आवारातील चंदनाचे झाड कापून त्याचे खोड चोरुन घेउन गेले होते. यावरुन विजय सरपाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 278 /2022 हा भा.दं.सं. कलम- 395 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार हे तुळजापूर तालुक्यात गस्तीस असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, काळ्या रंगाच्या एका स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 15 बीएन 9132 मध्ये काही इसम चंदणाच्या झाडाची लाकडे घेउन सोलापूरच्या दिशेने जात आहेत. यावर पथक माळुंब्रा येथे सापळा लाउन थांबले असता नमूद स्कॉर्पिवो 14.30 वा. सु. थांबवून गाडीतील इसमांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी 1)रईसखान गौसखान पठाण 2)आसीफखा जमादारखा पठाण, दोघे रा. आडगाव (मा.), ता. औरंगाबाद 3)रौफखा रशीदखा पठाण 4)मोईनखा मज्जीदखा पठाण, दोघे रा. मरसोली, ता. फुलंबरी, जि. औरंगाबाद 5)शहीदखा गनिखा पठाण, रा. कुंजखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद असे नावे सांगितले. 

पथकाने संशयावरुन स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता आतमध्ये चंदनाच्या झाडाची तासलेली लहान- मोठी अशी 14 लाकडे व कुऱ्हाड, तीन करवती, लोखंडी वाकस, गिरमिट, लोखंडी हेक्सॉ पाते असे दिसुन आले. पथकाने नमूद स्कॉर्पिओसह त्या पाच व्यक्तींना ताब्यात घेउन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे गुन्ह्याचा अधिक तपास केला असता नमूद गुन्ह्यातील चंदनाचे झाड त्यांनीच चोरी केल्याचे समजले. यावर पोलीसांनी त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता ते स्कॉर्पीओ वाहन हे रौफखा पठाण यांचे असून आनंदनगर पो.ठा. येथील गुन्हा क्र. 270/2022 भा.दं.सं. कलम- 379 या गुन्ह्यातील चोरीच्या चंदनाची 10 लाकडेही त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने त्यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील चंदनाची एकुण 14 लाकडासह कुऱ्हाड, तीन करवती, लोखंडी वाकस, गिरमिट, लोखंडी हेक्सॉ पाते, 5 मोबाईल फोन व गुन्हा करण्यासाठी वापरलेले नमूद स्कॉर्पीओ वाहन असा एकुण 5,04,000 ₹ किंमतीचा माल हस्तगत केला. 

तसेच त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सदर बाजार येथील पोलीस बंगला आवारातून दोन चंदनाची झाडे चोरी केल्याची कबुली दिली. यावर पथकाने सोलापूर पोलीसांशी संपर्क साधला असता पोलीस बंगला परिसरातून चंदनाची झाडे चोरी गेल्यावरुन सदर बाजार पो. ठा. येथे गुन्हा क्र. 788/2022 भा.दं.सं. कलम- 379 सह महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम कलम-2,3 अंतर्गत नोंद असल्याचे समजले. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील चंदन चोरीच्या दोन गुन्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील एका गुन्ह्याचा पडदाफाश केला असून गुन्ह्यातील त्यांच्या उर्वरीत चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी . पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, सपोनि-  शैलेश पवार, पोउपनि- संदीप ओहोळ, पोहेकॉ- हुसेन सय्यद, प्रकाश औताडे, जावेद काझी, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, शौकत पठाण, अशोक ढगारे, अशोक कदम, पोकॉ- रविंद्र आरसेवाड, योगेश कोळी, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.