मुरूम शहरात  महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट

 धार्मिक भावना दुखावणाऱ्या १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल 
 

मुरुम :मुरूम शहरात ७ मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले. धार्मिक तेढ निर्माण केली म्हणून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

सय्यद गल्ली, मुरुम येथून दि 07 मे रोजी 20.15 वा. सु.बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक चालली होती. यावेळी या मिरवणूकीत सामिल असलेल्या विलास वाडकर, देवराज संगुळगे, प्रताप गिरबा, अप्पु लामजने, उमेश कारडामे, संतोष स्वामी, राम भोंडवे, अर्जुन बरदाळे यांसह अन्य अनोळखी 4 पुरुष यांनी दोन जातीत धार्मीक तेढ निर्माण होईल या उद्देशाने गल्लीत दगड फेक केली. 

यात मुरुम येथील सय्यद ईस्माईल मुल्ला, जाफर कोतवाल, अरबाज डिग्गे, शारुख जेवळे, सोहेल मुल्ला हे जखमी होउन गल्लीतील इसाक दिवटे यांच्या गाडीची काच फुटून आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या सय्यद मुल्ला यांनी दि. 8 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद लोकांसह संगीत वाद्य यंत्रणा चालक- सरताजखान सिराजखान पठाण यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 153, 295, 337, 143, 147, 148, 149, 324, 323, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.