उस्मानाबाद जिल्हा क्रिडा कार्यालयाची फसवणूक

देवळालीच्या जागृती विद्यामंदीरचे सचिव , मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल 
 

उस्मानाबाद  : बनावट कागदपत्रे व अभासी कामे कागदपत्री दाखवून जिल्हा क्रिडा कार्यालयाची  २८ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी  देवळाली,ता. कळंब येथील-जागृती विद्यामंदीरचे सचिव लक्ष्मण जाधवर,मुख्याद्यापक सौ मिरा जाधवर व सर्व पदाधिकारी यांच्याविरुद्ध उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातुर अंतर्गत असलेल्या देवळाली,ता. कळंब येथील-जागृती विद्यामंदीर (सचिव)- श्री. लक्ष्मण जाधवर,(मुख्याद्यापक) सौ मिरा जाधवर व सर्व पदाधिकारी,सदस्य यांनी सन- 2008 ते 2020 या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करुन क्रिंडागण समपातळीत करणे, तारेचे कुपंण करणे,मैदनावर पिण्याचे पाण्याची सोय करणे,भंडारगृह बांघणे,विविध खेळाचीमैदाने तयार करणे,व्यायामशाळा साहित्य  याची बनावट कागदपत्रे व अभासी कामे कागदपत्री दाखवून जिल्हा क्रिडा कार्यालय उस्मानाबाद व जागृती विद्या मंदीर देवळाली येथे शासनाची एकुण 28,36,000 ₹ रकमेचा अपहार केला. अशा मजकुराच्या जिल्हा क्रिडा अधिकारी- नदिम शेख यांनी दि. 18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 409, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुरात बँक कर्मचाऱ्याकडून खातेदाराची फसवणूक 

तुळजापुर  : उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि. शाखा नळदुर्ग रोड तुळजापुर येथे कर्तव्यावर असणारे - राजकुमार चंद्रकांत मोरे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 06.12.2022 रोजी 13.00 ते 16.00 या दरम्यानच्या काळात उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि. शाखा खातेदार प्रकाश मुढें रा. ढेकरी यांचे बचत खाते क्र.28377 नावाने पैसे  काढण्यासाठी विड्राल स्लिपवर स्वताची सही करून ती खोटी आहे हे माहित असतांना ही सदर स्लिप  खरी आहे असे भासवून त्याचा वापर करून बॅकेची व खातेदाराची 15,000 ₹ रक्कमेचा  स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केला. अशा मजकुराच्या बॅक शाखा अधिकारी- श्री. जनार्धन माडे यांनी दि. 18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 468, 471, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.