उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी 

 

बेंबळी  : रुईभर, ता. उस्मानाबाद येथील- सागर विलास कोळगे यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची बजाज सिटी 110 एक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 1783 ही दि. 29.10.2022 रोजी 21.00 ते दि. 30.10.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान कोळगे यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर कोळगे यांनी दि. 01.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : मुरळी, ता. उमरगा येथील- प्रमोद विश्वनाथ मुरळीकर, वय 48 वर्षे यांच्या राहत्या घराच्या जिन्यावरील दरवाजातून अज्ञात व्यक्तीने दि. 31.10.2022 रोजी 22.30 ते 01.11.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान प्रवेश करुन घरातील कपाटात असलेली 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,72,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,42,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रमोद मुरळीकर यांनी दि. 01.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : ढोकी, ता. उस्मानाबाद येथील- मंगल किसन कदम, वय 68 वर्षे या दि. 31.10.2022 रोजी 15.30 वा. सु. रामवाडी गट क्र. 156 मधील शेतातील सोयाबीन पीकाची मळणी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रामवाडी ग्रामस्थ- उज्वला गाढवे, प्रतिक गाढवे, किरण गाढवे या तीघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन मंगल कदम यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रतिक व किरण यांनी मंगल यांना फोन करुन त्यांचे सोयाबीन पीक जाळण्याची धमकी देउन उज्वला व प्रतिक यांनी संगणमताने मंगल यांच्या नमूद शेतातील सोयाबीन पीक पेटवून देउन त्यांचे अंदाजे 1,50,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या मंगल कदम यांनी दि. 01.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 504, 506, 109, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : ईडा येथील साखर कारखाना आवारातील एका ऊस वाहतूक बैलगाडीचे अंदाजे 5,000 ₹ किंमतीचे एक लोखंडी डिस्क दि. 01.11.2022 रोजी 08.00 ते 14.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कारखाना कर्मचारी- किशोर सुग्रीव दुरुंदे, रा. तांदुळवाडी, ता. परंडा यांनी दि. 01.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.