उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 

वाशी  : डोकेवाडी, ता. भुम येथील गणेश तुकाराम थोरात, वय 35 वर्षे हे दि. 02.05.2022 रोजी 14.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी वाशी ग्रामस्थ- विनायक रमेश क्षिरसागर यांनी गणेश यांच्या घरात घुसून “माझ्या बहिणीस का मारले.” असा जाब गणेश यांना विचारुन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश थोरात यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 325, 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : चिंचोली (कोटे), ता. लोहारा येथील सागर मोहन करदोरे यांसह त्यांच्या कुटूंबीयांशी दि. 22.04.2022 रोजी 19.30 वा. सु. राहत्या गल्लीत गावकरी- पाटील कुटूंबातील गौतम, अभिषेक, उत्तम, जगदीश, विमल यांचा जनावरांना पाणी पाजण्याच्या कारणावरुन वाद झाला. यात पाटील कुटूंबीयांनी सागर करदोरे यांसह गोविंद करदोरे, शोभा करदोरे, अमोल करदोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, कुऱ्हाडीच्या तुंब्याने व दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सागर करदोरे यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : सापनाई, ता. कळंब येथील समाधान बापु पायाळ, वय 38 वर्षे हे दि. 03.05.2022 रोजी 08.30 वा. सु. त्यांच्या घरासमोर असतांना गावकरी- अजय, सुरज, अतिष, शशिकांत बबन तुपारे या चौघा भावांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन समाधान यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, साखळीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समाधान पायाळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : उदारीचे पैसे मागीतल्याच्या कारणावरुन बलसुर, ता. उमरगा येथील निसार रफिक शेख, दाउत ईस्माईल डोंगे यांनी दि. 03.05.2022 रोजी 00.30 वा. सु. गावातील चांदणी चौकात गावकरी- आसद कबीर शेख यांना शिवीगाळ करुन दाउत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहान केली तर निसार यांनी विळ्याने आसद यांच्या मानेवर, कानावर वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या आसद शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.