उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 

अंबी  : कुक्कडगांव, ता. परंडा येथील गावातील उर्साची वर्गणी न दिल्याच्या कारणावरुन दि. 23.04.2022 रोजी 12.00 वा. सु. समाज मंदीरासमोर गावकरी- दाउद व लादेन खलील शेख या दोघांनी सादीक बशीर शेख यांना शिवीगाळ करुन काठी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सादिक शेख यांनी दि. 24 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : रुई, ता. परंडा येथील लक्ष्मण साधु चौधरी यांच्या शेतातील कडबा गंजीवर दि. 23.04.2022 रोजी 12.30 वा. सु. शेजारील- मधुकर तानाजी चव्हाण यांच्या शेळ्या आल्या असता लक्ष्मण यांनी त्यांना हाकलले या कारणावरुन लक्ष्मण चौधरी यांनी दगड फेकून मारुन लक्ष्मन यांना जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मण चौधरी यांनी दि. 324, 337 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मस्सा (खं.), ता. कळंब येथील शिवशाला केरबा ताटे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन  दि. 24.04.2022 रोजी 10.30 वा. सु. गावातील महादेव मंदीराजवळ भाऊबंद- गोरख श्रीपती ताटे वय 60 वर्षे यांना शिवीगाळ करुन दगड फेकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या गोरख ताटे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : भोगलगांव, ता. भुम येथील तारामती हरिश्चंद्र काळे या आपल्या पतीसह दि. 24.04.2022 रोजी 14.30 वा. सु. आपल्या शेतात होत्या. यावेळी त्यांचा पुतण्या- भरत काळे हे शेतबांधावर दगड रोवत असतांना तारामती यांनी शेत मोजणी झाल्यास दगड रोवण्यास सांगीतले असता भरत काळे यांसह चंद्रकला काळे, महावीर काळे या तीघांनी तारामती व त्यांचे पती- हरिश्चंद काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच चंद्रकला यांनी तारामती यांच्या हाताच्या बोटासा चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या तारामती काळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.