उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 

तुळजापूर  : समर्थनगर, तुळजापूर येथील सुभाष व लक्ष्मी सुभाष फुलारी या दोघा पती- पत्नींनी बांधकामाच्या कारणावरुन दि. 22.01.2022 रोजी 09.00 वा. सु. गल्लीतील- शरद सोनटक्के यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली. यावेळी शिवीगाळ केल्याचा जाब शरद यांची पत्नी- मिनाक्षी यांनी नमूद फुलारी पती- पत्नीस विचारला असता त्यांनी मिनाक्षी यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन, चावा घेउन जखमी केले. तसेच शरद यांची नोकरी घालवण्याची त्यांना धमकी दिली. अशा मजकुराच्या मिनाक्षी सोनटक्के यांनी दि. 16.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
तामलवाडी  : यमगरवाडी, ता. तुळजापूर येथील अंगणवाडी जवळील रस्त्यावर काटेरी फांद्या टाकल्याचा जाब ग्रामस्थ- भागवत अंकुश वाघमारे यांनी दि. 16.02.2022 रोजी 10.00 वा. सु. गावकरी- बिभीषन व वंदना बिभीषन कांबळे यांना अंगणवाडी जवळ असतांना विचारला. यावर चिडून जाउन कांबळे पती- पतींनी भागवत यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, खुरप्याने मारहान करुन जखमी केले व “तुला आम्ही बघुन घेउ.” असे धमकावले. अशा मजकुराच्या भागवत वाघमारे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : लोहारा (बु.), ता. लोहारा येथील ‘सातबारा हॉटेल’ मध्ये दि. 13.02.2022 रोजी 21.30 वा. सु. मिनी ट्रक क्र. एम.एच. 12 एसएफ 5425 आलेल्या चालकासह अन्य एका व्यक्तीने हॉटेल चालक- पंचु  बाबुराव कोकणे यांना जेवण मागीतले. यावर कोकणे यांनी जेवण संपले असून हॉटेल बंद करण्याचीही वेळ झाली असल्याचे सांगीतले. यावर चिडून जाउन त्या दोघांनी जवळच पडलेल्या लोखंडी सळईने कोकणे यांना तसेच त्यांच्या बचावास आलेल्या विश्वनाथ लोहार यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या पंचु कोकणे यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत पेटसांगवी, ता. लोहारा येथील प्रभाकर व वैभव प्रभाकर मुळे आणि सुधाकर व साहेब सुधाकर पवार या चौघांनी दि. 15.02.2022 रोजी 12.00 वा. सु. गावकरी- निर्मला दिलीप देशमुख यांच्या शेत रस्त्याच्या बाजूस एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने चर खोदून ती दगड –माती रस्त्यावर टाकुन निर्मला यांचा शेत रस्ता आडवला. तसेच निर्मला यांनी याचा जाब त्यां चौघांना विचारला असता त्यांनी निर्मला यांना शिवीगाळ करुन लाथाबुकक्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निर्मला देशमुख यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.