उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

नळदुर्ग  : केशेगाव, ता. तुळजापुर येथील- चन्नाप्पा बाबुराव साखरे यांची अंदाजे 5000 ₹ किंमतीची बजाज पल्सर मोटारसायकल क्र.एम.एच.25 एव्ही 8361 ही दि.07.01.2023 रोजी 21.00 ते दि.08.01.2023 रोजी 08.30 वा.सु.गावातील आपल्या घरा समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चन्नाप्पा साखरे यांनी दि.09.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : गडदे गल्ली, ता. लातूर येथील- नरसिंग प्रभाकर गडदे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची सी बी युनिकॉर्न मोटारसायकल ही दि.06.01.2023 रोजी 18.45 ते 07.30 वा. सु. नळदुर्ग येथील हॉटेल महाराजा समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नरसिंग गडदे यांनी दि.09.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : पिनरारई, ता. थलसेरी, जि.कन्नूर राज्य केरळ येथील- निखील रमेशान के हे दि. 08.01.2023  रोजी 19.30 वा. पुर्वी  विजोरा पाटी  येथुन हसनगड जात असताना विजोरा पाटी  येथे त्यांनी ट्रक थांबवला असता ट्रक मधील ताडपत्री फाडून अंदाजे 2,43,324 ₹ किंमतीचे इंदुलेखा ऑईल कंपनीचे 32 बॉक्स अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. अशा मजकुराच्या निखील रमेशान के यांनी दि.09.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  :   हावरगाव, ता. कळंब येथील- आण्णासाहेब भास्कर कोल्हे यांच्या हावरगाव येथील शेतातुन अंदाजे 5,65000 ₹ किंमतीचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर हेड क्र.एम.एच.25 एस 7260 व दोन फळी नांगर हे अज्ञात व्यक्तीने दि.04.01.2023 रोजी 19.15 ते दि.05.01.2023 रोजी 05.30 वा. दरम्यान चोरुन नेले. अशा मजकुराच्या आण्णासाहेब कोल्हे यांनी दि.09.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.