उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

बेंबळी   : चिखली, ता. उस्मानाबाद येथील- चेतन चंद्रकांत सुरवसे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र.एम.एच.25 एपी  4579 ही  दि.06.01.2023 रोजी 15.00 ते 16.00 वा. दरम्यान  चिखली ते औसा रोडलगत शाम चव्हाण यांचे वर्कशॉप समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चेतन सुरवसे यांनी दि.07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : घाटकोपर पुर्व, मुबंई येथील-अरूण सैनाजी कटकधोंड हे दि. 07.01.2023 रोजी 08.00 वा.सु. नळदुर्ग परिसरात खंडोबा यात्रेत नदीवर अंघोळ करण्यासाठी गेले असता. त्यांच्या काढून ठेवलेल्या विजारीतील 15 ग्रॉम वजनाचे सुवर्ण दागिणे, मोबाईल फोन व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण अंदाजे 49,000 ₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अरूण कटकधोंड यांनी दि.07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम   : आरसोली शिवारातील इंडस कंपणीच्या टावर नं.1239766 चे अंदाजे 18,000 ₹ किंमतीचे केबलचे 06 नग असे एकुण सुमारे 180 मीटर केबल अज्ञात व्यक्तीने दि. 23.10.2022 रोजी पहाटे 04.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या कर्मचारी- महादेव पंडीत ढवण, खंडाळ, ता. तुळजापुर यांनी यांनी दि. 07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : सागंवी, ता. अक्कलकोट येथील- गंगुबाई आंबादास देडे, वय 26 वर्ष या दि.06.01.2023 रोजी 14.30 वा. दरम्यान मैलापुर नळदुर्ग येथील खंडोबाचे दर्शनास गेल्या होत्या. दरम्यान गर्दीचा फायदा घेउन तीन अनोळखी स्रीया व एक पुरूष यांनी गंगुबाईचे गळ्यातील अंदाजे 12,500 ₹ किंमतीचे 3 ग्रॉम वजनाचे सुवर्ण दागिणे जबरीने चोरून नेले. अशा मजकुराच्या गंगुबाई देडे यांनी दि.07.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.