उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

ढोकी  : कोल्हेगाव, ता. उस्मानाबाद येथील- जनार्धन शंकर गायकवाड, वय 65 वर्षे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची भुरकट रंगाची एक म्हैस दि. 24.11.2022 रोजी 23.00 ते दि. 25.11.2022 रोजी 03.00 वा. दरम्यान कोल्हेगाव गट क्र. 62 मधील त्यांच्या भावाच्या शेतातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या जनार्धन गायकवाड यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब  : भोगली, ता. कळंब येथील- शिवाजी महादेव खराटे यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एएक्स 3825 ही दि. 21.11.2022 रोजी 11.30 वा. सु. गावातील समिक्षा बियर बार समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी खराटे यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : कोळीवाडा, उमरगा येथील- सय्यद महेबुब लदाफ यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची होंडा सीबी शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 6032 ही दि. 22.11.2022 रोजी 21.00 ते दि. 23.11.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सय्यद लदाफ यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : पुणे येथील- अंगद तुळशीराम कोतले हे सहपत्नीक दि. 09.11.2022 रोजी 14.45 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना गर्दीच्या फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने अंगद यांच्या पत्नीच्या पाटीशी अडकवलेल्या सॅकची चैन श्रीमती कोतले यांच्या नकळत उघडून आतील अंदाजे 77,000 ₹ किंमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अंगद कोतले यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.