उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 

वाशी : वाशी येथील- आनंद अरविंदराव देवडीकर यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएक्स 1158 ही दि. 22.11.2022 रोजी 01.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आनंद देवडीकर यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 नळदुर्ग
 : काझी गल्ली, नळदुर्ग येथील- अब्बु सलमान जहिरोद्दीन काझी यांच्या नळदुर्ग गट क्र. 26 मधील शेत विहीरीवरील अंदाजे 9,000 ₹ किंमतीची ज्योती कंपनीची विद्युत मोटार दि. 17.10.2022 रोजी 20.00 ते दि. 18.10.2022 रोजी 09.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अब्बु काझी यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब  : कळंब येथील- मनोहर पांडुरंग करंजकर व मनोज बबन करंजकर यांच्या अनुक्रमे कळंब गट क्र. 140 व 139 मधील शेतातील तुषारसिंचनचे 26 पाईप, 10 नोजल, स्टार्टर बॉक्स आणि एक विद्युत मोटार असे एकुण 37,000 ₹ किंमतीचे साहित्य दि. 24.11.2022 रोजी 19.00 ते 21.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मनोहर करंजकर यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 ढोकी  : पळसप, ता. उस्मानाबाद येथील- पांडुरंग जयदेव निकम यांच्या राहत्या शेडचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने दि. 21.10.2022 रोजी 01.00 ते 03.00 वा. दरम्यान उघडून आतील अंदाजे 24,990 ₹ किंमतीचा विवो मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या पांडुरंग निकम यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.