उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल 

 

तामलवाडी  : खडकी, ता. तुळजापूर येथील अजय नागनाथ नागणे, आकाश शिंदे, शुभम शिंदे, इम्रान शेख हे चौघे दि. 07 जून रोजी 10.00 वा. सु. गावातील रस्त्याने मोटारसायकने जात होते. यावेळी गावकरी भंडारे कुटूंबातील- मुरलीधर, किरण, बबन, सचिन, संदीप, विठ्ठल व विजय उबाळे, संतोष कांबळे यांसह 10 स्त्री- पुरुषांनी जुन्या वादावरुन उपरोक् चौघांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी गज, काठी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या अजय नागणे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 336, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : एमआयडीसी, उस्मानाबाद येथील नागेश चंद्रकांत विंचुरे व प्रणिता विंचुरे या दोघांनी दि. 05 जून रोजी 14.00 वा. सु. नेहरु चौक, उस्मानाबाद येथे भाऊबंद- विशाखा गणेश विंचुरे यांना भुखंड मालकीहक्काच्या वादातून शिवीगाळ करुन लाथांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत विशाखा विंचुरे यांच्या डाव्या हाताचे हाड मोडून त्या जखमी झाल्या. अशा मजकुराच्या विशाखा विंचुरे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आष्टाकासार, ता. लोहारा येथील सुरेश नागनाथ वाघमोडे हे दि. 06 जून रोजी 18.00 वा.सु. आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- महादेव वाघमोडे यांसह त्यांचा मुलगा- प्रकाश तसेच बळीराम वाघमोडे यांसह त्याची मुले- प्रकाश, विकास या सर्वांनी सुरेश यांच्या शेतात जाउन जुन्या वादाच्या कारणावरुन सुरेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात सुरेश यांच्या डाव्या बरगडीचे व डाव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुरेश वाघमोडे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 325, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : देवंग्रा, ता. भूम येथील विनोद डोके हे दि. 09 जून रोजी 16.00 वा. सु. गाव शिवारातील रस्त्याने मोटारसायकल  चालवत जात होते. यावेळी गावकरी- रामचंद्र बरकडे, बापु बरकडे, महादेव डोके, भैया डोके या चौघांनी मो.सा. व एक्सकॅव्हेटर यंत्र विनोद यांच्या मो.सा. ला आडवे लाउन वाळु काढण्यासाठी ट्रॅक्टर न आनल्याच्या कारणावरुन विनोद यांना शिवीगाळ करुन लोखंडी पट्टी, काठी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. तसेच विनोद यांचा भ्रमणध्वनी फोडून त्यांचे आर्थिक नुकसान करुन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विनोद डोके यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग   : अणदुर, ता. तुळजापूर येथील जमनशहा रजबशहा फकीर, रहमतबी फकीर, गुलाम फकीर, रेशमा यांसह सोलापूर येथील अनिशा शेख, ईस्माइल शेख, नुरजहा शेख, तसलीम या सर्वांनी दि. 01 जून रोजी 14.00 वा. सु. लोहारा येथील शैबाज खासीमशहा फकीर यांच्या जागेत जाउन शैबाज यांचे पत्रा शेड पाडुन नुकसान केले. यावेळी शैबाज यांचे पिता- खासीमशहा यांनी नमूद लोकांना त्याचा जाब विचारला असता त्यांनी खासीमशहा यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व ठार मारण्याची धमकी दिली.

            याच प्रकरणात अणदुर, ता. तुळजापूर येथील जम्मन फकीर हे दि. 29.05.2022 रोजी 01.00 वा. सु. गट क्र. 164 / 09 मधील आपली शेत जमीन पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी नमूद शेत जमीनीच्या मालकी हक्काच्या कारणारुन लोहारा येथील भाऊबंद-शैबाज खासिमशहा फकीर यांसह त्यांचे पिता- खाशिमशहा तसेच महम्मद, फराह, रहमतबी या सर्वांनी जम्मन फकीर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली.

            अशा मजकुराच्या शैबाज फकीर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 427, 323, 504, 506 अंतर्गत तर रहमतबी जम्मन फकीर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवले आहेत.