जागजीत शेतीच्या वाटणीवरून हाणामारी 

 

ढोकी  : जागजी, ता. उस्मानाबाद येथील बालाजी जावळे हे दि. 05 मे रोजी 11.00 वा. सु. गट क्र. 242 मधील आपले शेत नांगरत होते. यावेळी भाऊबंद- जालिंदर गोरोबा जावळे व अशोक जावळे या दोघा पिता- पुत्रांनी तेथे जाउन शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन बालाजी जावळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व डोक्यावर, छातीवर चाकूने वार करुन बालाजी यांना जखमी केले. अशा मजकुराच्या आकाश बालाजी जावळे, जागजी यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील सतिश शिवाजीराव देवकते हे दि. 11 मे रोजी 15.00 वा. सु. शहरातील त्यांच्या ‘हॉटेल साई’ येथे होते. यावेळी हॉटेलच्या मालकी हक्काच्या कारणावरुन भाऊ- राकेश शिवाजी देवकते यांनी सतिश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन गॅसची टाकी उजव्या पायावर मारुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सतिश देवकते यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी 

लोहारा  : नागुर, ता. लोहारा येथील मदन बब्रु मस्के, वय 60 वर्षे यांचे राहते घर दि. 11- 12 मे दरम्यान कुलूप बंद होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील सुटकेसमधील 13 ग्रॅम सुवर्ण दागिने, 50 कि.ग्रॅ. वजनाचे ज्वारी व हरभरा धान्याचे प्रत्येकी एक पोते चोरुन नेले. अशा मजकुराच्या मदन मस्के यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : वाशी येथील महाजन मोहन काळे यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 2316 ही दि. 08 मे रोजी 13.00 ते 14.00 वा. दरम्यान आठवडी बाजार, वाशी येथून चोरुन नेली. अशा मजकुराच्या महाजन काळे यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.