उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी 

 

तुळजापूर  : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील दत्ता हरिश्चंद्र क्षिरसागर यांच्या आईसोबत गावाकरी- राजेंद्र पंढरी सगट हे दि. 21.04.2022 रोजी 20.00 वा. सु. भांडण तक्रारी करत होते. यावेही दत्ता यांनी त्याचा जाब राजेंद्र यांस विचारला असता राजेंद्र यांनी दत्ता यांस शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान केली. यावेळी त्यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई व भावासही राजेंद्र यांसह संगिता सगट, संभाजी सगट, लक्ष्मी सगट, नंदा रसाळ यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्ता क्षिरसागर यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : त्रिकोळी, ता. उमरगा येथील हारीदास भानुदास सुरवसे हे दि. 21.04.2022 रोजी 19.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असतांना शेतबांध फोडण्याच्या कारणावरुन भाऊ- हनुमंत दिनकर सुरवसे यांनी त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हारीदास सुरवसे यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील शाहेद हसन शेख यांची हिरो पॅशन एक्सप्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 4224 ही दि. 21.04.2022 रोजी 18.50 ते 10.00 वा. दरम्यान उस्मानाबाद येथील मध्यवर्ती ईमारती जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शाहेद शेख यांनी दि. 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : वालवड गावातील टेलीफोन कार्यालयाचे मोबाईल मनोऱ्याचे आरएफ  20 ×20 मीटरचे तीन केबल अज्ञात व्यक्तीने दि. 23.04.2022 रोजीच्या रात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या टेलीफोन कार्यालयाचे कर्मचारी- संजयकुमार वलथरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.