उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी हाणामारी
परंडा : शेत रस्ता बंद करायला लावल्याच्या संशयावरुन देवळाली, ता. भुम येथील निलेश शिंदे, शुभम तांबे, सुनिल तांबे यांनी दि. 02 जून रोजी 21.00 वा. सु. गावातील नदीजवळ भाऊबंद- काकासाहेब श्रीहरी तांबे यांना शिवीगाळ करुन निलेश यांनी हातोडीने तर सुनिल यांनी कोयत्याने मारहान केली. यात काकासाहेब यांचा उजवा पायाचे हाड तीन ठिकाणी मोडून व डाव्या पायाचे बोट तूटून ते गंभीर जखमी झाले. यावेळी काकासाहेब यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पित्यासही नमूद तीघांनी काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले.
याच प्रकरणी देवळाली येथील सुनिल बब्रुवान तांबे यांनी प्रथम खबर दिली की, भाऊबंद- श्रीहरी गणपत तांबे व काकासाहेब या दोघा पिता- पुत्रांनी सुनिल यांचा मुलगा- शुभम यांस दि. 02 जून रोजी 21.00 वा. सु. विष पाजल्याने सुनिल हे शुभम यास औषधोपचारकामी गावातील नदीजवळील रस्त्याने घेउन जात होते. यावेळी श्रीहरी व काकासाहेब यां दोघांनी सुनिल हे शेत विकत नसल्याच्या कारणावरुन सुनिल यांची मो.सा. अडवून शिवीगाळ करुन कोयता व दगडाने मारहान करुन सुनिल व शुभम यांना गंभीर जखमी केले.
अशा मजकुराच्या काकासाहेब तांबे व सुनिल तांबे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 325, 326, 341, 504, 506, 34 अंतर्गत परस्पर विरोधी दोन गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी : इंदापुर, ता. वाशी येथील आश्विनी विशाल कुंभार या आपल्या पतीसह दि. 04 जून रोजी 20.00 वा. सु. आपल्या पत्रा शेडमध्ये होत्या. यावेळी गावकरी- सत्यवान गपाट, गणेश कोरे, निलेश चोपडे, गणेश गपाट, नितीन पवार, भीमाशंकर माने, योगेश चोपडे, सुंदर पारडे, हिंदुराज गपाट, ऋषीकेश गपाट, सुरज पारडे या सर्वांनी नमुद कुंभार पती- पत्नीस पत्रा शेड काढण्याच्या कारणावरुन शिवीगाळ व मारहान केली. मारहानी दरम्यान गणेश गपाट यांनी विशाल यांच्या अंगावर चटणी टाकली, तर सत्यवान गपाट हे तलवार घेउन धावून आले. तर बाकी लोकांनी विशाल यांना काठीने, पट्ट्याने मारहान करुन जखमी केले तसेच संजय पारडे यांनी विशाल यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करुन आश्विनी यांना ओढून घराबाहेर काढले. अशा मजकुराच्या आश्विनी कुंभार यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 120 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भूम : सोनगिरी, ता. भूम ग्रामस्थ- मंगल शंकर काळे या दि. 30.05.2022 रोजी 09.00 वा. सु. गावातील शेत मालक- भगवान कुटे यांच्या शेतातील झाडाचे आंबे उतरवीत होत्या. यावेळी भगवान कुटे यांचे भाऊबंद- गणेश कुटे, अर्चना कुटे, भरत कुटे या तीघांनी आंबे उतरविण्याच्या वादातून मंगल काळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. यात मंगल यांच्या उजव्या मनगटाचे हाड मोडल्याने त्या जखमी झाल्या. अशा मजकुराच्या मंगल काळे यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 334 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : हंद्राळवाणी, ता. उमरगा येथील सचिन गोविंद बिराजदार हे दि. 06 जून रोजी 08.30 वा. सु. गावातील मारुती मंदीरात असताना गावकरी- भरत व सोपान राम कुंभार या दोघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन सचिन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात सचिन यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सचिन बिराजदार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भूम : भुम येथील फळ विक्रेते जुनेद बागवान हे दि. 05 जून रोजी 09.00 वा. सु. धारीवाल मैदानात आपल्या तीन भावांसह उभे होते. यावेळी ऑनलाईन रकमेच्या व्यवहारातील वादातून गावकरी- कदीर व शबीर सौदागर, हनुमंत लष्कर, मोहसीन यांसह एका अनोळखी तरुणाने जुनेद यांसह त्यांच्या तीन्ही भावांस शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, कोयत्याने मारहान करुन जखमी केले. तसेच मोहसीन याने पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जुनेद यांनी आज दि. 07 जून रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 323, 504, 506 सह शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.