उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी हाणामारी 

 

तुळजापूर  : भवानी आनंदराव कदम, रा. तुळजाईनगर, तुळजापूर हे दि. 03 जू रोजी 02.20 वा. सु. जुने बस स्थानक, तुळजापूर येथील रोचकरी कॉम्पलेक्स येथे गेले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेले हडको, तुळजापूर येथील सुशांत सपाटे, स्वप्नील मोरे या दोघांनी जुन्या वादातून भवानी यांना लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या भवानी कदम यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : ख्वाँजानगर, उस्मानाबाद येथील अफसर चाँद शेख बाहेर गावी वेल्डिंगचे काम करण्यासाठी दि. 02 जून रोजी फकीरानगर येथील रस्त्याने जात होते. यावेळी गल्लीतीलच- इब्राहीम शेख यांसह तीन अनोळखी पुरुषांनी अफसर यांना अडवून, “तू बाहेर गावचे वेल्डिंग काम केले तर तूला आम्ही ठार मारु.” असे धमकावून, शिवीगाळ करुन त्यांना काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अफसर शेख यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद येथील अल्ताफ महेबुब शेख हे दि. 02 जून रोजी 08.00 वा. सु. उस्मानाबाद येथील जनावरांच्या बाजारात असताना बोकड खरेदी- विक्रीच्या कारणावरुन गावकरी- जहिर कुरेशी, खलील सौदागर, जावेद कुरेशी, मुज्जमील कुरेशी यांच्या सोबत त्यांचा वाद झाला. यातून नमूद चौघांनी अल्ताफ शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अल्ताफ शेख यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : खडकी, ता. तुळजापूर येथील बापु उबाळे, बाबासाहेब मस्के, विजय उबाळे, लक्ष्मी उबाळे, निता जेटीथोर, राधीका मस्के हे सर्व दि. 02 जून रोजी 09.00 वा. सु. गावकरी- गजेंद्र सिताराम सोनवणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर थांबले होते. यावेळी गावकरी- विद्याधर रामा सोनवणे यांना जाण्यास रस्ता नसल्याने त्यांनी नमूद लोकांना बाजूला सरकण्यास सांगीतले. यावर चिडून जाउन नमूद लोकांनी विद्याधर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, मारहान केली. तसेच बापु उबाळे यांनी विद्याधर यांच्यावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या विद्याधर सोनवणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : सांगवी, ता. उस्मानाबाद येथील सोमेश्वर गोरोबा सुरवसे हे दि. 01 जून रोजी 17.30 वा. सु. गावातील चौकात थांबले होते. यावेळी गावकरी- दादा शिंदे, अदिनाथ शिंदे, समाधान शिंदे यांनी जुन्या वादाच्या कारणावरुने सोमेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सोमेश्वर सुरवसे यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : औराद, ता. उमरगा येथील राजेंद्र सुभाष ईल्लाळे हे दि. 02 जून रोजी औराद गट क्र. 35/3 मधील आपलया शेतीची मशागत करत होते. यावेळी गाकवरी- दयानंद व सुशांत मोहन कारभारी या दोघा भावांनी शेत मशागतीच्या कारणावरुन राजेंद्र ईल्लाळे यांना खाली पाडून दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. यावेळी राजेंद्र यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पित्यासही नमूद दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजेंद्र ईल्लाळे यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.