उस्मानाबाद, तुळजापूर , ढोकी, परंडा येथे हाणामारी 

 

उस्मानाबाद  : जियान समीर मुल्ला, वय 17 वर्षे, रा. बार्शी हा दि. 08 मे रोजी 15.00 ते 16.45 वा. दरम्यान गांधी नगर, उस्मानाबाद येथील साईलिला हॉटेलच्या जलतरण तलावात पोहत असताना बुडून मरण पावला. जलतरण तलावाचे चालक- मालक यांनी तलावावर जीव रक्षक तसेच अन्य कोणतीही सुरक्षा न ठेवल्याने जियान हा जलतरण तलावातील पाण्यात बुडून मयत झाला आहे. अशा मजकुराच्या जियानचे मामा- फिरोज इनुस पठाण, रा. गालीबनगर यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : खंडाळा, ता. तुळजापूर येथील बालाजी माणिक लोखंडे हे दि. 6 मे रोजी 16.00 वा. गट क्र. 143 मधील आपल्या शेतात नांगरणी करत होते. यावेळी भाऊबंद- औदुंबर लोखंडे यांसह त्यांची दोन मुले- राजेंद्र व वासुदेव यांनी नांगरणी अडवून बालाजी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी राजेंद्र याने बालाजी यांच्या डोळ्यावर विषारी द्रव्याचा फवारा मारल्याने बालाजी यांना कायमचे अंधत्व आले. अशा मजकुराच्या बालाजी यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 328, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : रमजान मधील गुरुदक्षिणा म्हणुन जमा केलेली वर्गणी कमी असल्याच्या वादातून पळसप, ता. उस्मानाबाद येथील सिद्दीक शेख, सादिक शेख, शौकत शेख, समीर शेख, सलिम शेख, गैबु शेख यांनी दि. 05 मे रोजी 10.00 वा. सु. गावातील मशीद समोर गावकरी- खलील तय्यब पटेल, वय 45 वर्षे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच शौकत शेख यांनी खलील यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या खलील पटेल यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : पिंपळवाडी (चांदणी), ता. परंडा येथील महेश बळीराम काकडे हे दि. 08 मे रोजी 21.30 वा. सु. गावातील बसथांब्यावर होते. यावेळी ग्रामस्थ- अजिनाथ गायकवाड व ओंकार या दोघा पिता- पुत्रांनी तेथे जाउन महेश यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावर महेश यांनी त्यांना त्याचा जाब विचारला असता नमूद पिता- पुत्रांनी महेश यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश काकडे यांनी दि. 9 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.