उमरगा तालुक्यात हुंडाबळी ! पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल 

 

मुरूम - शिवन कामाचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून पैसे आन म्हणून छळ आणि जाच केल्याने कोराळ ता. उमरगा येथील स्वाती राजेंद्र लाळे, वय 24 वर्षे या नवविवाहित महिलेने राहत्या घरात दोरीने गळफास लाउन आत्महत्या केली. याप्रकरणी  राजेंद्र मारुती लाळे (पती) व शारदाबाई मारती लाळे (सासु) यांच्याविरुद्ध मुरूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील प्रथम खबरी- स्वप्नील देवराज बेळळे ( रा. भुरीकवटे, ता. अक्कलकोट )  यांची बहिण श्रीमती स्वाती राजेंद्र लाळे, वय 24 वर्षे यांनी कोराळ येथील आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास लाउन आत्महत्या केली. स्वाती लाळे यांचे पती- राजेंद्र लाळे व सासु- शारदाबाई लाळे हे दोघे शिवन कामाचे दुकान टाकण्यासाठी व स्वाती व राजेंद्र यांच्या लग्नात स्वाती यांच्या माहेरकडील लोकांनी मानपान व्यवस्थीत न केल्यामुळे स्वाती यांनी माहेरहुन पैसे आणावे यासाठी ते दोघे स्वाती यांचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करत होते. या छळास कंटाळून स्वाती यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या स्वप्नील बेळळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरूम पोलिसांनी राजेंद्र मारुती लाळे (पती) व शारदाबाई मारती लाळे (सासु) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.