सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

कळंब  : कळंब येथील शाकेर नदाफ, सय्यद ताहेरअली, अभिषेक हराळे, सलमान पठाण व संजय कसबे हे सर्व दि. 26 मे रोजी 14.00 ते 17.00 वा. दरम्यान कळंब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत आपापल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत कळंब पो.ठा. येथे 5 गुन्हे नोंदवले आहेत.

सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी  : ख्वॉजानगर, उस्मानाबाद येथील सोहेल शेख हे दि. 26 मे रोजी 16.00 वा. सु. तामलवाडी टोल नाका येथील राष्ट्रीय महामार्गावर पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 एजे 3546 ही निष्काळजीपने चालवित असताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.