सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन चालवणाऱ्या, उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर जिवीतास धोका होईल अशारितीने वाहन चालवणाऱ्या तसेच धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या अशा 6 चालकांवर दि. 18.02.2022 रोजी उस्मानाबाद पोलीसांनी कारवाया करुन भा.दं.सं. कलम- 279, 283 अंतर्गत खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले.

1) लोहारा पोलीसांनी 4 कारवाया केल्या असून यात जमीर फकीर रफिक सिध्दकी, बलभिम विरुदे, तीघे, रा. लोहारा यांनी लोहारा येथील चौकात तर अंकुश राठोड, रा. होळी तांडा यांनी सास्तुर येथील चौकात आपापली वाहने रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

2) तुळजापूर पोलीसांनी 2 कारवाया केल्या असून अंकुश बंडगर, रा. कार्ला व शाम मोरे, रा. काक्रंबा यांनी आपापल्या ताब्यातील वाहने तुळजापूर येथील नवीन बस स्थानकयेथे जिवीतास धाकादायकपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

 
लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करुणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

तुळजापूर  : तुळजापूर नगरपरिषदेचे पथक दि. 14.02.2022 रोजी 13.00 वा. सु. खटकाळ गल्लीतील धनंजय शिवाजी जमदाडे यांच्या दुकानासमोरच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण काढत असतांना जमदाडे यांसह पांडुरंग डिगंबर नाईकवाडी या दोघांनी पथकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यांनतर त्या दोघांनी दि. 16.02.2022 रोजी 13.15 वा. सु. नगरपरिषदेतील स्वच्छता विभागामध्ये जाउन कर्मचारी- दत्तात्रय रामभाउ साळुंके यांच्याशी अतिक्रमण काढण्यासंदर्भात वाद घालून, शिवीगाळ करुन साळुंके यांच्या टेबलावरील रजीस्टर खाली फेकुन दिले व खटकाळ गल्लीत पाय ठेवल्यास हात-पाय तोडण्याची धमकी‍ दिली. यावरुन दत्तात्रय साळुंके यांनी दि. 18.02.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.