लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर‍ गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद  : लातुर येथील सुलक्षण सुदाम शिंदे यांसह माउली नावाच्या व्यक्तीने तुळजापूर येथे नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी घेण्यासाठी  दि. 30 मे रोजी 16.30 वा. सु. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे त्यांनी डॉ- अश्विनी किसनराव गोरे यांना प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत धमकावले. अशा प्रकारे नमूद दोघांनी गोरे यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन डॉ. अश्विनी गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : वरुडा गट क्र. 487, 788 या जमीनीला जाण्यायेण्यासाठी गट क्र. 490 व  489 मधून रस्ता उपलब्ध करण्याचा तहसीलदार यांचा निर्णय झाला होता. त्यानुसार उस्मानाबाद महसूल विभागाचे मंडळ अधिकारी- अनिल बब्रुवान तिर्थकर यांसह पथक दि. 30 मे रोजी 13.30 वा. सु. नमूद ठिकाणी रस्ता उपलब्ध करुन देत होते. यावेळी वरुडा ग्रामस्थ- गोरोबा व रामेश्वर मधुकर रोटे यांसह शुभम गोरोबा रोटे, प्रसाद पांडुरंग गाढवे या सर्वांनी पथकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच प्रसाद याने अनील तीर्थकर यांच्या बोटास चावा घेउन त्यांना जखमी करुन त्यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन मंडळ अधिकारी- अनिल तिर्थकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.