तुळजापुरात दोन पुजाऱ्यावर गुन्हा दाखल 

 

तुळजापूर  :  पुजारी –कृष्णा जितकर व संदीप टोले हे दिनांक 05 एप्रील रोजी 15.00 वा तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्त व्यवस्था अंतर्गत तुळजाभवानी मंदीराच्या दर्शन मंडपातील रांगेत भावीकांना  घुसवन्याचा प्रयत्न करत होते.  यास  सुरक्षा रक्षक दिपक चौगुले यांनी  आक्षेप घेउन पुजा-यांना तेथुन बाहेर जाण्यास सांगितले असता नमुद दोन्ही पुजा-यांनी सुरक्षा रक्षक चौगुले यांना शिवीगाळ करुन धक्का बुक्की केली तसेच ढकलत बाहेरील पाटील वाडयाजवळ नेउन ठार मारण्याच्या उददेशाने त्यांच्या डोक्यात व मानेवर वीटेने मारहाण केली. अशा मजकुराच्या चौगुले यांनी वैद्यकिय उपचारा दरम्यान दिलेल्या प्रथम खबरे वरुन  दि. 9 एप्रिल रोजी भा.द.सं कलम 307,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : समुद्रवाणी ग्रामस्थ्‍ – अभीमन्यु घुले हे दिनांक  5 एप्रिल रेाजी 11.00 वाजता शिवारातील गट क्रमांक  2 मधील शेतात कुटुंबासह  पीक कापणी करत होते. यावेळी गावकरी मधुकर व मंगल गोमदे या पती –पत्नीनी शेतात येउन शेतावर व पिकावर मालकी हक्क सांगुन  घुले कुटुंबीयांना शिवीगाळ करुन घुले कुटुंबीयावर पोलीसांत खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अभिमन्यु यांनी  दि. 9 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 447, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बेंबळी  : लमाण तांडा,मेंढा येथील ग्रामस्थ-कांताबाई राठोड या दिनांक 7 एप्रील रोजी पती –नागनाथसह गावातीलच एका शेतात उसतोड करत होत्या.  यावेळी  गावकरी –बबन जाधव यांसह त्यांचे कुटुंबीय  तानाजी, आकाश, सोजरबाई, सुधाकर यांनी  जुन्या वादाच्या पार्श्वभुमी वरुन नागनाथ व कांताबाई या पती-पत्नीना शिवीगाळ करुन जमीनीवर खाली पाडुन काठीने मारहाण केली.  अशा मजकुराच्या सोजरबाई यांनी  दि. 9 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 326, 504, 507 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.