कोंड : परिचारिका पत्नीचे लफडे पाहून पतीने मृत्यूला कवटाळले 

 

उस्मानाबाद - परिचारिका पत्नीचे लफडे पाहून पतीने मृत्यूला कवटाळल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे घडली. याप्रकरणी मयताच्या भावाने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असता पत्नी व तिचा प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी  परिचारिका पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. 

 उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाती सतीश तिवारी ( माहेरचे आडनाव ठाकूर )  ही महिला ढोकी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे . तिचा विवाह कोंड येथील सतीश कवरसिंग तिवारी यांच्यासोबत झाला होता, त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्तेही झाले आहेत.

 सतीश तिवारी हा  त्याच्या पत्नीसोबत ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कॉटरमध्ये राहत होते . त्यांचा प्रपंच सुखामध्ये चालत होता,तीन वर्षापासून सतीश व त्याची पत्नी स्वाती या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता, हा वाद चारित्र्याच्या संशयावरून होत होता अशी चर्चा सध्या सुरू आहे . दरम्यान 31 मे 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये सतीश हा  गेला असता त्याला त्याच्या क्वार्टरमध्ये ढोकी येथील विवेक देशमुख व स्वाती हे एकत्र असल्याचे रुमध्ये संशयास्पद  दिसले ,त्यावरून  दोघांना जाब विचारला असता त्याला सतीशची पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांनी मिळुन सतीशला बेदम  मारहाण केली दरम्यान सतीश याने ढोकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली आहे.

सतीश तिवारी यांना पत्नीची वागणूक पसंत पडत नसल्यामुळे तो पत्नीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता ,मात्र ती त्याचे ऐकत नसल्याने सतीश याने त्याला हा त्रास सहन न झाल्याने अखेर दि.५/६/२०२२ रोजी  कोंड गावांमध्ये  शेतामध्ये  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.  सतीशची पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांचे अनैतिक संबंध होते  अशा स्वरूपाची तक्रार सतीश तिवारी याचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी याने ढोकी पोलिस ठाण्यांमध्ये रीतसर दिली आहे.ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राऊत यांच्या आदेशावरुन ढोकी पोलीस ठाण्यामध्ये कलम 306 व 34 प्रमाणे स्वाती सतीश तिवारी व विवेक देशमुख या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान घटनेची माहिती वार्‍यासारखी गावांमध्ये पसरल्याने सतीश तिवारी याचे नातेवाईक गावकरी हे घटनास्थळी पोहोचून जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता दरम्यान वातावरण तापले होते. ढोकी पोलीस ठाण्यात तात्काळ सतीश तिवारी याची पत्नी व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करून सतीश च्या पत्नीला ढोकी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव निवळला यावेळी घटनास्थळी ढोकी पोलीस  ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक गाडे , क्षिरसागर , गुंजकर , नांदे ,गोडगे आदी पोलीस कर्मचारी पोहचले होते.