पारा, गोजवाडा, सिंदफळ येथे हाणामारी 

 

वाशी  : पारा, ता. वाशी येथील- आकाश विठ्ठल घरत व फक्राबाद, ता. वाशी येथील- नारायण जनार्धन धस या दोघांत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 30.10.2022 रोजी 15.30 वा. सु. पारा शेत शिवारात वाद झाला. यानंतर आकाश घरत हे आपल्या वाहनाने जात असताना नारायण धस यांसह त्यांचे गावकरी- अक्षय मुरकुटे, बालाजी धस, बप्पासाहेब मुरकुटे या चौघांनी एका कारमधून येउन आकाश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश घरत यांनी दि. 06.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : गोजवाडा, ता. वाशी येथील- भरत रामकृष्ण थोरबोले वय, 24 वर्षे व गावकरी- थोरबोले कुटूंबातील- धर्मराज, सिध्देश्वर, भाउसाहेब, आण्णासाहेब, पुष्पाबाई यांसह दत्तात्रय वाघमारे यांच्यात जुना वाद आहे. दि. 30.06.2022 रोजी 18.00 वा. सु. भरत थोरबोले हे शेतातील आपल्या गोठ्यात असताना नमूद लोकांनी संगणमताने तेथे जाउन भरत यांच्या डोळ्यात चटणी टाकून ठार मारण्याच्या उद्देशाने भरत यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी भरत यांच्या बचावास शेजारील- नरसिंग थोरबोले यांनी धाव घेतली असता नमूद लोकांनी त्यांनाही कुऱ्हाडीच्या तुंब्याने, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भरत थोरबोले यांनी मा. न्यायालयात दिलेल्या प्रथम खबरेवरुन न्यायालयाच्या आदेशाने नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 147, 148, 149, 307, 326, 325, 324, 323, 441, 447, 452, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सिंदफळ, ता. तुळजापूर येथील- संभाजी कापसे, पांडुरंग जाधव व पांडुरंग नागमोडे असे दि. 06.11.2022 रोजी 09.00 वा. सु. सिंदफळ शिवारातील शेतरस्ता दुरुस्त करत होते. यावेळी गावकरी- ज्योतीराम माळी, विश्वजीत नवगीरे, संतोष माळी, अशोक नवगीरे, रमेश नवगीरे, देवीदास माळी, बबन माळी या सर्वांनी संगणमताने तेथे जाउन शेतरस्ता दुरुस्तीच्या कारणावरुन नमूद तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ज्योतीराम यांनी कुऱ्हाडीने तर विश्वजीत नवगीरे यांनी कोयत्याने ठार मारण्याच्या उद्देशाने पांडुरंग जाधव यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तर संतोष माळी यांनी पांडुरंग नागमोडे यांना मारहान करुन जखमी केले ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संभाजी कापसे यांनी दि. 06.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.