हंगरगा आणि खामसवाडी येथे हाणामारी 

 

तुळजापूर  : हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर येथील- बबन राजेश माने, वय 26 वर्षे हे दि. 16.10.2022 रोजी 00.30 वा. सु. आपल्या घरात असताना गावकरी- गोकुळ अर्जुन पवार, रवि गोकुळ पवार व बंडु या तीघांनी माने यांच्या घरासमोर जाउन माने यांना घराबाहेर बोलावून शेतगड्याशी वाद घातल्याच्या कारणावरुन त्या तीघांनी माने यांना तलवारीने, काठीने, दगडाने मारहान करुन माने यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या बबन माने यांनी 17.10.2022 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 34 सह शस्त्र कायदा कलम- 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : खामसवाडी, ता. कळंब येथील- हनुमंत गणपती पांचाळ व त्यांची आई- रंजना हे दोघे दि. 17.10.2022 रोजी 12.00 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर येथील- नवनाथ बाळासाहेब सुतार यांनी पांचाळ यांच्या घरात घुसून जुन्या वादाच्या कारणावरुन हनुमंत यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ केली. तसेच नवनाथ यांनी त्या दोघांच्या डोक्यात सत्तुरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हनुमंत पांचाळ यांनी दि. 17.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 452, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग येथे चोरी 

 
नळदुर्ग  : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील- पंकज रमेश पुदाले यांच्या रामतिर्थ येथील शेतातील 12.5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप व 200 फुट केबल असे एकुण 9,000 ₹ किंमतीचे साहित्य दि. 13.10.2022 रोजी 22.45 वा. ते दि. 17.10.2022 रोजी 11.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पंकज पुदाले यांनी दि. 17.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत इटकळ, ता. तुळजापूर येथील- रेश्मा भिमाशंकर घंटे यांच्या इटकळ येथील बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.10.2022 रोजी 00.20 ते 02.30 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील कपडे वस्तू अस्ताव्यस्त फेकून 2,250 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रेश्मा घंटे यांनी दि. 17.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.