लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : अनंत उंकुशराव कवडे हे दि. 25.02.2022 रोजी उसमानाबाद बस आगारात सोलापुर – भुम या बसची तपासणी करत होते. यावेळी पुर्वीच्या वादावरुन अमेश दिलीप पवार, रा. उस्मानाबाद यांसह त्यांच्या सोबतच्या एका अनोळखी पुरुषाने अनंत कवडे यांसह बी.बी. काळे यांना शिवीगाळ करुन चापट, बुक्क्याने मारहान करुन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनंत कवडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 114, 332, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे दाखल
नळदुर्ग : किलज, ता. तुळजापूर येथील कल्याण सखाराम मोजगे यांनी दि. 23.02.2022 रोजी 14.30 वा. सु. किलज शेत शिवारात भाऊ- रमेश सखाराम मोजगे यांना विहीरीवरील विद्युत पंप बंद करण्यास सांगीतला. यावर रमेश यांनी, “विद्युत पंपाचा तुमचा काय संबंध नाही.” असे कल्याण यांना म्हणून शिवीगाळ केली. तसेच रमेश यांसह त्यांची पत्नी- मिनाक्षी, मुलगा- विशाल यांनी कल्याण यांना दगड, काठीने मारहान केली. यावेळी कल्याण यांच्या बचावास आलेल्या त्याच्या पत्नीसही नमूद तीघांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कल्याण मोजगे यांनी दि. 25.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : बोर्डा, ता. कळंब येथील परमेश्व मनोहर शेळके यांसह कुटूंबातील 2 व्यक्ती यांचा गावातीलच सुनिल मगन शेळके यांसह कुटूंबातील 3 व्यक्तींशी शेत रस्त्याने रहदारी करण्याच्या कारणावरुन दि. 25.02.2022 रोजी 11.30 वा. सु. बोर्डा शिवारात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही शेळके कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर शेळके व सुनिल शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.