रांजणीत घरफोडी,  22 तोळे सोने लंपास 

 

शिराढोण  : दि.03.12.2022 रोजी 21.30 वा चे सुमारास रांजणी, ता. कळंब येथील रहिवाशी मुस्तफा बडेसाब शेख यांचे राहते घराचे कुलुप तोडुन कपाटामधील 22 तेाळे वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 1,07,980 रु किंमतीचे तसेच 21,000 रु रोख रक्कम आणि मुस्तफा शेख यांचे घरासमोर राहणारे अनिल शेख यांची बजाज कंपनीची मोटार सायकल क्रं.एमएच 25 अेएक्स 8464 हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मुस्तफा बडेसाब शेख यांनी दि. 07.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,379,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मोटारसायकलची चोरी 

उमरगा  : ता. उमरगा येथील- ज्ञानेश्वर गायकवाड यांची अंदाजे 15,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 4780 ही दि.30.12.2022 रोजी 23.30 वा. सु. राहत्या घरासमोर पार्क केली असता अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. तसेच गुंजेाटी येथील रहिवाशी नामे अनिल वाघमारे यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 अेआर 4969 ही दि.07.12.2022 रोजी 09.00 वा. सु. राहत्या घरासमोर पार्क केली असता अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.  अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल वाघमारे यांनी दि. 07.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत 02 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहे

उस्मानाबाद  : खाजानगर उस्मानाबाद  येथील- सोयल सय्यद यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 1287 ही दि. 04.12.2022 रोजी 23.00 वा. सु. खाजानगर गल्ली नं 19 या परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सोयल सय्यद यांनी दि. 07.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.