भूमचे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांना धक्काबुक्की 

 

परंडा : परंडा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अशोक खुळे हे दि.10 मार्च रोजी 13.30 वा इंदिरा नगर येथील शाळेतील इयत्ता 12 वी च्या परिक्षेविषयक परिरक्षक कार्यालयात कार्य करत होते. नमुद ठिकाणी परिक्षा विषयक कार्य करणा-या लोकसेवकांव्यतिरीक्त अन्य कोणासही प्रवेश नसल्याचे माहीती असतानाही वंजारवाडी ,ता.भुम  येथील शिवाजी व अनिल जगदाळे या पिता-पुत्रांनी परिक्षेच्या वादातुन यावेळी तेथे जाउन अशोक खुळे यांच्या गचांडीस धरुन त्यांना धक्का-बुक्की व शिवीगाळ केली. यावरुन अशोक खुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं 353,341,323,504,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धोकादायकपणे अग्नी प्रज्वलीत करणा-या दोघांवर गुन्हे  दाखल 

भूम  : भुम पोलीस दि. 10 मार्च रोजी गस्तीस असताना सुकटा गावात रामदास गलांडे यांनी तर भुम येथील साप्ताहिक बाजार मैदानालगत भारत कोळेकर यांनी आप-आपल्या वडापाव हातगाडयावर मानवी जीवीतास धोका निर्माण होइल अशा निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत केला असल्याचे निदर्शनास आले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं 285 अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शेतातील पिक जाळणा-यावर गुन्हा दाखल

उमरगा  : कवठा येथील व्यंकट सोनवने यांच्या शेतातील सुमारे 10 मेट्रिक टन हरभ-याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने दि.09 मार्च रोजी 20.00 वा सुमारास नुकसान करण्याच्या उददेशाने आग लावल्याने ती गंज पुर्णपणे जळाली. यावरुन भा.द.सं 435,427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.