भूम : भुईमुग पिकात डुकरांना प्रतिबंध करण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडला , पण घडले विपरीतच... 

 

भूम : तालुक्यातील उमाचीवाडी येथे एका शेतकऱ्याने  भुईमुग पिकात डुकरांना प्रतिबंध करण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडला , पण डुकराऐवजी एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

उमाचीवाडी, ता. भुम येथील- बिरमल परबत ठोंबरे यांनी त्यांच्या शेतातील भुईमुग पिकात डुकरांना प्रतिबंध करण्यासाठी त्या शेतास तारेचे तात्पुरते कुंपण करुन त्यात हयगईने व निष्काळजीपने वीज प्रवाह सोडला होता. 

गावकरी-गितांजली कृष्णा ठोंबरे, वय 24 वर्षे या दि. 09.08.2022 रोजी 11.00 वा. सु. शेतातील विहीरीकडे जात असताना त्या विद्युत भारीत तारांचा स्पर्श झाल्याने अंगातून वीज प्रवाहीत होउन त्या मयत झाल्या. यावरुन गितांजली यांची आई- उषा माने, रा. डुक्करवाडी, ता. भुम यांनी अकस्मात मृत्युच्या चौकशीत दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत दि. 05.09.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.