नळदुर्ग येथे ऑटोरिक्षा चालकाची फसवणूक 

 

नळदुर्ग  : नळदुर्ग येथील ऑटोरिक्षा चालक- मोसीन शेख यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 05.09.2022 रोजी 11.31 वा. सु. एका भ्रमणध्वनीवरुन कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण क्रेडीट कार्ड कार्यालयाचा प्रतिनिधी असल्याचे सांगूण क्रेडीट कार्ड सुविधा बंद करण्याच्या बहाण्याने मोसीन यांना एक ॲपलीकेशन मोबाईलमध्ये घेण्यास सांगीतले. मोसीन यांनी ते ॲप घेउन त्या व्यक्तीने सांगीतल्याप्रमाणे त्यातून आपले क्रेडीट कार्ड स्कॅन करताच मोसीन यांच्या क्रेडीट कार्डवरुन अनुक्रमे 20,000 व 10,170 ₹ रक्कम काढली गेल्याचे संदेश त्यांना आले. अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा नोंद

 कळंब : करंजकल्ला, ता. कळंब येथील- अशोक गोरख शिंदे यांनी दि. 18.10.2022 रोजी 15.25 वा. सु. कळंब येथील ढोकी रस्त्यावर ॲपे रीक्षा वाहन क्र. एम.एच. 25 एफ 869 हे भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.