लोहाऱ्यात पोलिसांवर हल्ला, सहा जणांवर गुन्हा दाखल

 

लोहारा  : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे समाज मंदिर परिसरात 100 मिटर अंतरात उप विभागीय दंडाधिकारी यांचा जमाव बंदी आदेश लागु असून पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथक तेथे तैनात आहे. दि. 04.09.2022 रोजी 12.00 वा. सु. वर नमूद मंदीर परिसरात कानेगाव ग्रामस्थ- 1)आबाजी सोपान कांबळे 2)प्रतिक दगडु माने 3)धनराज दगडु कांबळे 4)जोतीराम गणपती सोनवणे 5)बळी धुळप्पा माने 6)उत्कर्ष बिभीषण कांबळे 7)सागर नारायण माने 8)लैला धनराज कांबळे 9)शांताबाई रघुनाथ माने यांसह अन्य चार- पाच लोकांनी बेकायदेशी जमाव जमवून मंदीरासमोर येउन आरडा- ओरड करण्यास सुरवात केली. 

यावर तेथे तैनात असलेल्या पोलीस पथकाने त्यांना जमाव बंदी आदेशाबाबत सांगीतले असता त्यांनी पोलीसांवर हल्ला करुन ठार मारण्याची धमकी देउन नमूद लोकांनी पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निमार्ण केला. तसेच पथकातील पोलीस नाईक- मनोज गायकवाड यांच्या पाठीत दगड मारुन त्यांना जखमी केले.

            यावरुन पोलीस नाईक- मनोज गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 145, 147, 149, 353, 332, 323, 504, 506, 188 अंतर्गत दि. 04.09.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.